मिशिगन
मिशिगन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उत्तरेकडील एक राज्य. पंचमहासरोवरांच्या प्रदेशातील या राज्याच्या भूभागाचे क्षेत्रफळ १,५०,७७९ चौ.किमी. आहे. जलाशयांनी ९९,९०९ चौ. किमी. प्रदेश व्यापला असून सुपीरिअर सरोवरातील रॉयल, ह्यूरन सरोवरातील ड्रमंड व मिशिगन सरोवरातील बीव्हर इ. मोठ्या आणि त्यांच्या जवळच्या लहान बेटांचाही समावेश या राज्यात होतो.